Wednesday, 4 November 2009

चांदण्या...



लांबून आलेल्या चांदण्याना  ,
        गुपीत काही सांगाव ;
स्वतःच्या मनातल्या खुशीने ,
        स्वतःच स्वतःला हसाव...


लांबून  त्यांना पाहिल की 
        हेवा त्यांचा वाटतो , पण-
जवळ आल्या की आनंदाचा 
        मनीच झुला झुलतो... 

झगमगतात त्या कश्या ?
        असे अनेक प्रश्न पडतात ; 
पण अजुन विचार केल्यास 
        उत्तरातसुद्धा प्रश्नच येतात....


शुभ्र तेजस्वी रुपानं  ,
       मन मोहून जात ; 
जावे त्यांच्याच सवे 
       असेच  सारख  वाटत ..!


               -- डॉ. कल्पेश पाटील. 

Tuesday, 3 November 2009

न लिहिलेलं आत्मचरित्र ......!







पक्ष्यांना जर आत्मचरित्र असती तर 
इतरांवरच्या  कुरघोडीच्या 
इतिहासाची पानं त्यात नसती.

सामोरी येऊ नयेत 
पण आहेत अशी...
अनेक उघडी सत्य नसती....!


खोटेपणा  मिरवणारी 
बोलती फुशारकी त्यात नसती ......!


स्वाभिमानाच्या बुराख्या आडचा 
नखरेल खोटारडेपणा  नसता ....!


असते फक्त निसर्गाच्या पवित्र्याचे 
निखळ , सखोल , उमलते सन्दर्भ .....!


मिळमीळीत वाटणार्या स्वच्छ सत्याचा प्रकाश 
पण ........
म्हणुन पक्ष्यांना आत्मचरित्र नाहीयेत 
कारण आम्हाला आमच्यापुरती पटेल तशी सत्य हवियेत.....!!!



                - डॉ.कल्पेश पाटील.

Monday, 2 November 2009

कोण म्हणतो मी जगत नव्हतो .....!


साचलेल्या पाण्यात असतांना
प्रवाहविना कुजणाऱ्या पाण्यात जगतांना ;
कोण म्हणतो , वाऱ्याच्या आशेने
मी जगत नव्हतो...!

श्वास गोठवीणाऱ्या थंडीत
काळजाचे ठोके चुकवीणाऱ्या भयाण शांततेत
कोण म्हणतो , फुप्फुसांच्या धगिने
मी श्वास फुलवत नव्हतो ....?


पिकल्या पानांची पानगळ पहातांना ,
निष्पर्ण झाडांना न्ह्याहाळतांना ,
कोण म्हणतो , येत्या वसंताचे
धुमारे माझ्या मनात फुटत नव्हते....?



ग्रीष्माच्या झळीने होरपळतांना
मृगजलाच्या शोधात हिंडतांना ,
कोण म्हणतो , काळ्या मेघाची
मी वाट पाहत नव्हतो.......?

ढगांच्या गडगडाटात , विजेच्या लाखलखाटात
भीतीने गांगरलेलो असतांना ,
कोण म्हणतो मी मेघांच्या सरींमधे
चिम्ब भिजत नव्हतो....?


हुडहुडी भरवणाऱ्या बर्फाळी हवेत,
श्वास गोठवीणाऱ्या थंडीत असतांना ,
कोण म्हणतो , मी हृदयाच्या थोक्याने
रक्त वितळवत नव्हतो......?

मी लुकलूकत्या तारयांचे
दीप मनात तेवत ठेवून जगत होतो......!
जगत आहे ...........!!
अणि जगत राहणार ................!!!

- डॉ कल्पेश पाटील.




Sunday, 1 November 2009

भोग.....


काही भोग असेच असतात ,
ओठ मीटून भोगायचे;
पापणीवरल्या पाण्याला
वाहाण्यापुर्तेच सांगायचे .

कही सुर असेच असतात ,
जुळतांना तूटायचे....!
आपण फक्त उरले सुरले ,
ओल्या कंठी आळवायचे ...!

कही वाटा अश्याच असतात ,
चालतांना हरावयाच्या....!
आपण फक्त उरल्या सुरल्या ,
पावलं खेचत तुडवायच्या...!

काही रुतु असे असतात ,
पान अन् पान झडायचे ....!
आपण फक्त उरले सुरले ,
पाचोळ्यात शोधायचे....!

कुठलेच वसे असे नसतात
उतुन मातुन टाकायचे...!
आपले भोग आपण ,
फक्त ओठ मीटून भोगायचे.....!!!
पापणीवरल्या पाण्याला वाहाण्यापुर्तेच सांगायचे ............!

- डॉ कल्पेश पाटील.

मैत्री केली आहेस म्हणुन सांगावास वाटतय...................!


गरज म्हणुन नात कधी जोडू नकोस;
सोय म्हणुन सहज असा तोडू नकोस !

रक्ताच नाही म्हणुन कवडीमोल ठरवू नकोस ,
भावनांच मोल ओळख मोठेपनात हरवूनकोस !

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यांवर नव नात जुळत असत,
जन्मभर पुरेल इतक भरून प्रेम मिळत असत !

तुझी ओंजल पुढे कर , कमीपणा मानू नकोस ,
व्यवहारातल देण घेण फक्त मध्ये आणू नकोस !

मिळेल तितक घेत रहा , जमेल तितक देत रहा ,
दिलं घेतलं सरेल तेव्हा ....पुन्हा मागुन घेत रहा !

समाधानात तड-जोड़ असते, फक्त जरा समजुन घे,
"नातं " म्हणजे ओझ नाही, मनापासून उमजुन घे !

विश्वासाचे 'चार' शब्द , दुसर कही देऊ नकोस ,
जाणीवपूर्वक "नात" जप , मध्येच माघार घेऊ नकोस.....!

मैत्री केली आहेस म्हणुन संगावास वाटतय .....................!!!
- डॉ . कल्पेश पाटील.