Thursday, 30 December 2010

पहिला पाऊस



























पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ....
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्या धारा,
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा !

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ,
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ !

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं,
अंगणामध्ये  , मोगर्यापाशी
तळं होऊन साचायचं !

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे,
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे !

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायच,
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं !

म्हणून ..
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !

                                  ---- डॉ . कल्पेश पाटील .

Monday, 24 May 2010

आज रात्र

 आज रात्र माझ्यावर सलली,
  झोपही  डोळ्यावर रुसली ;
           चांदण्या मोजव्या तर,
            नभही गच्च भरलेल;
जोडावी लक्तरे आयुष्याची
तर प्रत्येक ठिकाणी ठिगळ  पडलेल .......!!!

                                                                --डॉ. कल्पेश पाटील.

Monday, 15 February 2010

केवळ प्रयोग म्हणून...




आज उपवास मी केला
केवळ प्रयोग म्हणून करून पाहिला

"उपवास म्हणजे देवाच्या बाजुला बसाव,
पोटाला पिळून मनातील इच्छारूपी  तेल गाळाव"

डोळे बंद करून , श्वास मोजत होतो मी,
अंगावर येणारा प्रत्येक स्पर्ष अनुभवत होतो मी.

ह्रुदयाचे ठोके मस्ताकाला जागे करायचे,
पोटाची कळ मनाला बावरे करायचे.

आज ठरवुनच होतो मी,
काही झाल तरी उठायच नाही
प्राण जायची वेळ 
आली तरी पळायच नाही

कोरड्या तोंडी , उपाशी पोटी
स्तब्ध राहिलो मी,
एका डोळ्याने हळूच
देवाला रडतांना पाहिल मी....!

थोड्याच वेळात लख्ख प्रकाश पडला
अंगावर माझ्या स्वप्नाचा साक्ष्यात पाउस पडला
प्रेमाने जवळ घेत देव म्हणाला
"नाही रे मला बघवत ही व्यथा
 मलासुद्धा नाही आवडत उपवासाची ही प्रथा"

आज उपवास मी केला,
खरच, 
केवळ प्रयोग म्हणूनच करून पाहिला.....!!!
   
                              ---डॉ.कल्पेश पाटील.






Saturday, 13 February 2010

जीवन नुसते जगायचे नसते




जीवन नुसते जगायचे नसते,
तर त्याला सजवायचे असते,
सजवितान्ना एक लक्ष्यात ठेवायचे असते,
सजवितान्ना कुणीतरी हवे असते,
प्रेम नुसते करायचे नसते,
तर ते टिकवायचे असते,
ते टिकवायला दोघांचे प्रेम महत्वाचे असते.....!!!
                   
                     ---डॉ.कल्पेश पाटील.                  


Wednesday, 10 February 2010

आमचेच हाथ खाली राहिलेत





रुतुमाघून रुतू गेलेत 
                         वाट आपल्यांची पाहतांना,
श्वासाचे फुलोरे झालेत 
                         आपल्यांची साथ शोधतांना,
काळजाच्या ठोक्यांची नाही
                         कळली त्यांना किम्मत,
आमचेच हाथ खाली राहिलेत 
                         सर्वांना सावरतान्ना......!!!

खुप खुप शोधल
                       सगळी इमले पायथळी घातली
गर्दित सुध्हा डोळे झाकून 
                     न डगमगता उडी टाकली...
बाजूने निघूनही गेले असतील कदाचित
              आतुरतेने वाट पाहाणाऱ्या डोळ्यांची आस त्यांना नाही कळली

"आयुष्यावर बोलू काही " 
                      म्हणून खुप गर्दी करतात 
आयुष्याचा खरा प्रश्न समोर येताच 
                      कुठे हरपून जातात?

"आयुष्य म्हणजे केवळ शब्द नव्हेत"
                      "आयुष्य म्हणजे केवळ वचन नव्हेत"
एवढाच उपदेश देऊन 
                       गप्पा मारणारी लोक तुम्ही
कुठेतरी आयुष्याला शाब्दिक 
                        व्याख्या तरी द्या तुम्ही?

अहो, नाही येत आम्हाला
                         हां देखावेपणा
निदान याततरी विधात्याचा असेल 
                         काहीतरी शहाणपणा 

कर्णा प्रमाणे 
                        फिरतोय अजुनसुद्धा आम्ही 
ओल्या जखामांसाठी तेल 
                         शोधतांना
आमचेच हाथ खाली राहिलेत 
                          सर्वांना सावरताना......!!!

                                       ---डॉ. कल्पेश पाटील.