आयुष्यातले काही कळत नाही ;
कधी कधी दिवस शांत जळत नाही !
सावली देणारेच करतात करार उन्हाशी ;
पाझरणारे डोळेच खेळतात जीवशी !!
सोबत असणारेच तसे दूर असतात ;
पाऊल वाटच गुरफटून पाडतात !!!
वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते ;
नितीचे गणित कधी मांडता येत नसते !!!!
आयुष्यात तसे नसते काही भेटलेले ,
आयुष्य एक उत्तर - प्रश्न ठाऊक नसलेले !!!!!
डॉ.कल्पेश पाटील