Monday, 16 January 2017

ऊद्वस्थ जीवन माझे!!!



ऊद्वस्थ जीवन माझे,
कंठस्थ काळीज जाहले ;
झेलूनी कलंक ऊरावरी,
अंग पुर्णपणे मळलेले.

झिजूनी गेले पाय,
पदचर होता होता ;
तहान मिटून गेली,
मृगजळ पिता पिता.

वाट पाहूनी थकले,
आतूरलेले नेत्र माझे;
सतत वेचत राहती,
स्वप्न ते विखूरलेले.

थकला आता आत्मा,
नाही पुन्हा तो त्राण;
अभागी ठरलो पुन्हा,
मरणानेही फुंकलेे प्राण.

शापीत ठरले सर्व,
आशीर्वाद दिलेले सारे;
मेघांना का दोष देऊ,
जर फिरलेच मतलबी वारे.

थकूनी शांत माझा देह पडलेला,
पोकळ आशांवरती पूर्णपणे कुजलेला ;
गलका करीती गिधड-घारी आभाळी,
आशेत जणू त्यांना मृतदेह भासलेला.

अंती फक्त एकच आशा,
हा जन्म असातरी संपवावा ;
नसतील दिव्यात वाती,
पण अखेरचा ऊजेडतरी पडावा....!!!
                                                         -----   डॉ.कल्पेश पाटील.