Wednesday, 10 July 2019

मी......


Saturday, 6 July 2019

तो एक स्पर्श

तो एक स्पर्श....


अजुन हाथ थरथरणारे 
का कुणास ठाऊक....
अजुन संपुर्ण अंगावर
आलेले हे शहारे!

अजुन काळजात असलेली 
ही धडधड...
अजुन परत एकदा बघाव अशी
या डोळ्यांची तडफड!

सम्भ्रमात पडलो मी 
पुन्हा एकदा अयुष्यात....
काय असेल याचा 
नेमका निष्कर्ष!

कुणामुळे, का , कसं 
कळत नाहीत हे प्रश्न...
शांत डोळे मिटुन मी पुन्हा एकदा निजलेला
घट्ट बंद करुन काहितरी मुठीत मिटलेला!

वाटलं पुन्हा एकदा झाली पहाट 
अचानक संपली सय्यमाची वाट....
स्पंदनांच्या या मखमली 
सहज भासलं ,
या सगळ्यांमागच "कारण" 
खरच आहे का
तो एक स्पर्श .....!!!!

....डॉ. कल्पेश पाटील.