डोळे कश्यासाठी...?? बालपणी शेजारील बंटीची खेळणी बघण्यासाठी, मला पण तेच पाहिजे अस सांगत बाबांपुधे रडण्यासाठी, मामाच्या गावाला जाताना पळती झाडे पाहण्यासाठी, बालपणाचा एक एक क्षण मनापासून जगण्यासाठी.
डोळे कश्यासाठी..?? इवल्याश्या पापणित एक मोठे स्वप्न पाहण्यासाठी, आणि ते पूर्ण होइल याची आतुरतेने वाट पाहण्यासाठी, काहीतरी विशेष कराव अस एकच वेड लागण्यासाठी, आणि एका वेडाखातर अनेक राती जागण्यासाठी.
डोळे कश्यासाठी..?? निखळ यौवानातील पहिल-वहिल प्रेम करण्यासाठी एका छानश्या चेहर्यावर मनापासून मरण्यासाठी मनोमनी हलूवार पणे एकच मूक होकार देण्यासाठी. या होकाराची एक छबी आपल्या काळजात घेण्यासाठी
डोळे कश्यासाठी..?? जीवनाची ही शिडी सतत न थांबता चढण्यासाठी, सुख देण्यासाठी आणि दुखात रडण्यासाठी, सुखी-सफल जीवनाचे पांग कायमचे फिटण्यासाठी आणि सर्वात शेवटी,फक्त एकदा शांतपणे मिटण्यासाठी....!!