माझी आठवण कधीतरी येईलच तुला,
तू कदाचित रडशिलही,
हात तुझे जुळवून ठेव तू,
सगळी आसव तुझी त्यात सामावतील,
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बाघ त्याच्याकडे,
एकटाच राहिलेला तो थेंब मीच असेल...
माझ्या आठवणी एखाद्याला सांगताना,
तू कदाचित हसशिलही,
जो थांबेल तुझ्या ओठांवर,
नीट वापर त्याला,
अड़खडळलेला तो शब्द मीच असेल...
कधी सुटला बेधुंद गार वारा,
मोहक डोळे तुझे तू मिटून घेशील,
मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळूक,
नीट बघ जाणवून, ती झुळूकही मीच असेल...!!!
---डॉ. कल्पेश पाटील.
No comments:
Post a Comment