Sunday, 27 December 2009

वचन




लाटेच एकच उद्दिष्ट असत, 
कसही करून किनाऱ्याला गाठाव......!!!

किनाऱ्याला नसेल का वाटत,
कधी लाटेकडे धावाव.......?

कदाचित वाटत असुनही, त्याला ते शक्य नसाव 
आधार द्यायच वचन त्याच जमिनीशी पक्क असाव.....!!!

                              ----डॉ.कल्पेश पाटील.



Thursday, 24 December 2009

एक प्रवास!!!

 

एक प्रवास मैत्रीचा 
जश्या हळूवार पावसाच्या सरींचा...!
ती पावसाची सर अलगद येउन जावी 
अन सुंदरशी एक संध्याकाळ हळूच खुलून यावी...!!


एक प्रवास सहवासाचा
जणू अलगद पडणाऱ्या गारांचा...!
न बोलताही बरच काही सांगणारा 
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा...!! 



एक प्रवास शुन्याचा 
जणू हिमालायाशी भिडण्याचा...!
शुन्यातून नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीचा चाहुल देणारा...!!


एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्षणाला माणूस घडवण्याचा...!
हसता हसता रडवणारा 
अन रडवुन हळूच हसवणारा...!!


एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणाऱ्या दोन जिवांचा...!
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायचा...!!


एक प्रवास प्रयत्नांचा 
सुख दुखातील नाजुक क्षणांचा...!
अखंड घडवणाऱ्या माणुसकीचा
अन नवी उमेद देणाऱ्या घडींचा...!!


एक प्रवास 
तुमच्या आमच्या आवडीचा...!
साठवू म्हटले तर साठवणीचा
आठवू म्हटले तर आठवणीचा ...!!



इथे हळूच येउन विसावलाय .....एक प्रवास!!!



                                   ---- डॉ.कल्पेश पाटील.






Monday, 14 December 2009

आठवण

                                                                    
माझी आठवण कधीतरी येईलच तुला,
तू कदाचित रडशिलही, 
हात तुझे जुळवून ठेव तू,
सगळी आसव तुझी त्यात सामावतील,
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बाघ त्याच्याकडे,
एकटाच राहिलेला तो थेंब मीच असेल...


माझ्या आठवणी एखाद्याला सांगताना,
तू कदाचित हसशिलही,
जो थांबेल तुझ्या ओठांवर,
नीट वापर त्याला,
अड़खडळलेला तो शब्द मीच असेल...


कधी सुटला बेधुंद गार वारा,
मोहक डोळे तुझे तू मिटून घेशील,
मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळूक,
नीट बघ जाणवून, ती झुळूकही मीच असेल...!!!                                                                              
                                   
                                  ---डॉ. कल्पेश पाटील.





Sunday, 13 December 2009

नात मैत्रीच प्रेमात बदलत




















नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा कुणी आयुष्य बनत.


नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा तीच स्वप्नातही येण होत.

नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा घोळक्यात लक्ष्य फक्त तिच्याकडे असत.


नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा मन तिच्या विचारात रमत.



नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा मैत्रीपेक्ष्या अधिक काहीतरी हव असत.

नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा रोजच्या गप्पांच रूप बदलत 


नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा येताच ती समोर लाजायला होत 


नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस ,जेव्हा वाचताच ही कविता कुणीतरी आठवत...!
                              ----   डॉ. कल्पेश पाटील.









Saturday, 5 December 2009

डोळे कश्यासाठी..??





डोळे कश्यासाठी...??
बालपणी शेजारील बंटीची  खेळणी बघण्यासाठी,
मला पण तेच पाहिजे  अस सांगत बाबांपुधे रडण्यासाठी,
मामाच्या गावाला  जाताना पळती  झाडे  पाहण्यासाठी,
बालपणाचा एक एक क्षण मनापासून जगण्यासाठी.


डोळे कश्यासाठी..??
इवल्याश्या पापणित एक मोठे स्वप्न पाहण्यासाठी,
आणि ते पूर्ण होइल याची आतुरतेने वाट पाहण्यासाठी,
काहीतरी विशेष कराव अस एकच वेड लागण्यासाठी,
आणि एका वेडाखातर अनेक राती जागण्यासाठी.


डोळे कश्यासाठी..??
निखळ यौवानातील   पहिल-वहिल प्रेम करण्यासाठी
एका छानश्या  चेहर्यावर मनापासून  मरण्यासाठी
मनोमनी हलूवार पणे एकच मूक होकार देण्यासाठी.
या होकाराची एक छबी  आपल्या काळजात घेण्यासाठी


डोळे कश्यासाठी..??
जीवनाची ही शिडी सतत न थांबता चढण्यासाठी,
सुख देण्यासाठी आणि दुखात रडण्यासाठी,
सुखी-सफल जीवनाचे पांग कायमचे फिटण्यासाठी
आणि सर्वात शेवटी,फक्त एकदा शांतपणे मिटण्यासाठी....!!

                                  --डॉ.कल्पेश पाटील.

Monday, 30 November 2009

जन्माचे हे गणित






काय होतो मी,
      काय आहे मी,
संभ्रम मनीचा,
      घोटाळतो आहे मी

                                  काय दिले मी,
                                         काय घेतले मी,
                                  अर्थ जिंदगीचा
                                        उलगडतो आहे मी

चार दिस उन,
      चार दिस सावली,
वाट काट्याची,
      चालतो आहे मी..

                                सोसाट्याचा वारा,
                                      टपोर्‍या गारा,
                                हरवलेल्या दिश्यांना,
                                     शोधतोय निवारा..

ओठ शिवले,
       शब्द गोठले,
स्फुरताना काही,
       संदर्भही चुकले..

                               कुठला मृत्यु,
                                     कसला आत्मा,
                               शोधताना वाटले,
                                     जन्माचे हे गणितच
                               कसे काय चुकले....?



                                                ---डॉ. कल्पेश पाटील. 


Friday, 27 November 2009

जरा सांभाळून



बोलताना जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓,
फरक फक्त एवढाच की,
तलवारीन॓ मान तर,
शब्दांनी मन कापल॓ जात॓


जरी तलवारीच्या जखम॓तून रक्त
आणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू...
य॓त असल॓ तरी,
दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓.


म्हणून सांगतो शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓


शब्दच माणसाला जोङतात आणि
शब्दच माणसाला तोङतात
ह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायण
तर कधी महाभारत तर कधी कवीता रचतात


तुझ्या एका शब्दावर माझ॓ सर्वस्व अवलंबून आह॓
तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓
तर, तुझ्या एका शब्दावर
माझ॓ रडण॓ अवलंबून असत॓.


म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓............

                                      ---डॉ.कल्पेश पाटील.

Tuesday, 24 November 2009

पहिली कविता







पहिल्या कवितेचा प्रयत्न,
कसा करु? कळत नाही,
खूप काही मनात आहे,
पण कागदावरती येत नाही.


विषय घेऊ का चाल ठरवू,
सुरुवात आधी कशी करु?
मग म्हटल विषय नको,
सोप्या चालीचीच कविता करु.


चाल ठरवून झाली तरी,
विषय अजून शोधत आहे.
तो पर्यंत विषय सोडून,
नुसतेच यमक जोडत आहे.


कधी तरी शांतपणे,
पुन्हा एकदा प्रयत्न  करीन ,
चालीबद्दल नक्की नाही,
पण विषय तरी नीट धरीन.....

                                   ---डॉ.कल्पेश पाटील.

Monday, 23 November 2009

कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये




कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये, 
की आपल्याला त्याची सवय व्हावी;
तडकलेच जर हृदय कधी,
तर जोडताना असह्य यातना व्हावी.


डायरीत कुणाचे नाव इतकेही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे;
अचानक एक दिवस त्या नावाचे
डायारीत येणे बंद व्हावे.


स्वप्नात कुणाला असेही बघू नये
की अंधारातही त्याचे हात असावे;
तुटलेच जर स्वप्न कधी,
तर आपल्या हातात काहीच नसावे.


कुणालाही इतका वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार असावा;
एक दिवस आरशात आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा.


कुणाचे इतकेही एकू नये,
की आपल्या कानात त्याच्याच शब्दांचा घूमजाव व्हावा;
आणि एक दिवस आपल्या तोंडातून,
त्याच शब्दांचा उच्चार व्हावा.

पण...


कुणाच्या इतकेही दूर जाऊ नये,
की आपल्या सावलीशिवाय आपल्या सोबत काहीच नसावे;
दूरदूर आवाज दिला तरी,
आपले शब्द जागीच घुमावेत......

                                     ---डॉ.कल्पेश पाटील.

एकदा ती माझ्याकडे आली




एकदा ती माझ्याकडे आली,
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतच ती,
देऊन हात घेउन गेली...


होतो सोबत आम्ही चालत,
कधी शांत कधी बोलत;
पायवाट निळसर नव्हती संपत,
नभी चांदणे चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत.


सुरेल आवाज जणू कोकीळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत,
मनवट सुर बासरीचे उमलत,
हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची;
गालावर खळी नाजुक पडायची
नयन शिम्पल्यात जपावी वाटायची.


तरुतळी एका आम्ही बसलो,
मनीचे सारे तिला मी वदलो;
हात थरथरता तिच्या हातात,
परी नजर थेट तिच्या डोळ्यात.


काय झाल पुढे सांगत नाही,
स्वप्न पुन्हा सार आठवेच नाही;
झालो जागा तरी उठलो नाही,
करत विचार पडलो,
मी प्रेमामधे तर पडलो नाही...?

                            ---डॉ.कल्पेश पाटील.

एकट असाव अस वाटत...




एकट असाव अस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

अवती भोवती रान सगळ
मुक मुक असत,
वाट दिसु नये इतक
धुक धुक असत,
झाडाखाली डोळ मिटून बसावस वाटत...!


आपल आपण एकट असावस वाटत

येते येते हूल देते
सर येत नाही,
घेते घेते म्हणते तरी
जवळ घेत नाही,
अशा वेळी खोट खोट रुसावस वाटत...
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

कुठे जाते कुणासठाउक
वाट उंच सखल,
त्यात पुन्हा सगळीकडे
निसरडीचा चिखल,
पाय घसरुन आदळल्यावर ह्सावस वाटत...
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

पाखर जरी दिसली नाहीत
ऐकु येतात गाणी,
आभाळ कुठल कळ्त नाही
इतक निवळ पाणी,
आपल्या डोळ्यात आपल रूप दिसावस वाटत...

ओळीमागुन गाण्याच्या
थरारत जावस वाटत,
आभाळतुन रंग 
भरत जावस वाटत,
सुराच्या रानात भुलून फुलावस वाटत...


कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत ....!



                             ---डॉ. कल्पेश पाटील.

Sunday, 22 November 2009

कधी असेही जगून बघा….




माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..


कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..


संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..


वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..


प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..


अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..


आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..


                                   ---  डॉ. कल्पेश पाटील.

Thursday, 19 November 2009

तुला आवडतना म्हणून मला एक घरट बांधायच आहे.....!!!



तुला आवडतना म्हणून मला एक घरट बांधायच आहे,
आपण दोघांनी जमा केलेल्या गवतापासून
तोडक मोडक का होईना
आपल दोघांच एक छानस अस घरट  बांधायचय.......!


दोघांनी एकाच ताटात जेवायाचय,
भल थोडस उपाशी राहून
पण,सोबत जेवताना एकमेकांना भरवत,
मग मात्र पोटभर जेवायचय.....!
तुला आवडतना म्हणून मला एक घरट बांधायच आहे.......!!


थंडित कुडकूडतांना थोड़ी तुला थोड़ी मला,
अस करत एकाच चादरीत झोपतांना
तुझ्या प्रेमाच्या ऊबेत मात्र
मला सम्पूर्ण आयुष्य घालवायचय.....!
तुला आवडतना म्हणून मला एक घरट बांधायच आहे......!!


खुप खुप प्रेम करतांना,
थोडस तुझ्यावर रागवायचय
तुझ्या प्रेमात प्रत्येक दिवस
नव्या उमेदीन जगायचय.....!
तुला आवडतना म्हणून मला एक घरट बांधायच आहे......!!


                                      ---- डॉ. कल्पेश पाटील. 

Tuesday, 17 November 2009

ते पण एक वय असतं


ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं
ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं
ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत जॉबची स्वप्नं पहायचं
 

ते पण एक वय असतं
लग्नाच्या ' डॉमिनंट  स्टेटस ' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं


ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं

                                                               --- डॉ. कल्पेश पाटील.

Thursday, 12 November 2009

धबधब्यासारख आयुष्य असाव-



 धबधब्यासारख आयुष्य असाव-
खळाळते दुग्धतूषार उडवत जगाव;
रस्त्यांसारखे  इमले असावेत-
बुलंद आणि लांब जाणारे!


धुक्यासारख प्रेम कराव-
सगळ्यान्ना आपल्यात सामावून घेणार;
डोंगरा एवढी दुःख असावीत-
सर्वाना हेवा वाटावी अशी!


ओल्या जखमेंप्रमाणे अपमान असावेत-
सतत भळभळणारे;
ठंडी सारखी क्षमा असावी-
घरट्यात परतायला लावणारी!


प्राजक्ता सारख सुख असाव-
मंद मंद तुकडा वाटत फिराव;
पांघरुणासारखी नाती असावीत-
ऊबच ऊब देणारी!


आणि..........
 
सुर्यास्तासारख मरण असाव
विषण्णमनाने पहाव अस!




--डॉ.कल्पेश पाटील.

Tuesday, 10 November 2009

आयुश्याची सुरुवात



नुकतीच कुठे आयुश्याची सुरुवात होती,
पुस्तकाच्या पहिल्याच पानावर शेवटाची बात होती.


              सुर्य डोक्यावर आलेला अन् लख्ख उजाडलेले,
              मनाच्या गाभाऱ्यात मात्र आवसेची रात होती.


समजुन फूले ज्यांना मी हवेत उधाळले,
उमगले मज नंतर काट्याची ती जात होती.


            आयुश्याची लक्तरे अन जीवनाची झालेली दशा,
           खडतर या वाटेवरती फ़क़्त दुःखाचीच साथ होती.


आयुश्याच्या या दिपामध्ये काठोकाठ तेल भरलेले,
मिणमीणणार्या या दिपामधली संपलेली वात होती.
                 
                     --डॉ. कल्पेश पाटील.

Friday, 6 November 2009

मनातला पाऊस




पाऊस म्हणजे थंड वारा,
      पाऊस म्हणजे चिखल - गारा;
जीवनातही असतो प्रेमाचा वारा,
      आणि विचारांचा चिखल - गारा.


                                                                        मनात होत विचारांच वादळ ,
                                                                              भावनांची होते भलतीच गर्दळ ;
                                                                        आठवणींचा लखलखाट होतो,
                                                                              आतल्या आतच जीव गुदमरतो.

काळे धग समाज कंटकांचे
      घेरतात डोक्याला सर्व सरे;
बरसतात एका मागुन एक,
      विझवायाला  आयुष्याचे दीप तारे.


                                                          घन घोर अंधार , भयाण शांतता 
                                                               धुवून निघतात सर्व कल्पना 
                                                           अचानक होतो आभास सत्याचा;
                                                               उघडताच डोळे या हिरमुसल्या वासराला.

विसरलो होतो मी,
     की हा रुतुच न्यारा;
ज्यात नाही फक्त वादळ - वारा,
     पण आहे हर्षदायी तुषार फवारा .

                                                            यात नसतं फक्त वादळाच थैमान,
                                                                पण अजून असते इन्द्रधनुष्याची कमान;
                                                            नसतो फक्त निराशेचा थापट पसारा,
                                                                पण अजून असतो मोराचा फूलता पिसारा.



तुषार वर्षाव झेलता ओंजळीत,
  पळता झालेत धग सारे;
चिम्ब झाल्यावर त्या पावसात,
  स्तब्ध झाले सर्व वारे.


 नवीन विचार , नवी उमेद
   पण त्याच आठवणी, थोड़े खेद;
नवीन आधार , नवा जोश
   जाणार पुढे , विसरून सर्व भेद !



निष्पर्णी ते जीवन माझे,
   फुलले पुन्हा हिरवे गार;
मित्रांनो,
मनातला हा पाऊसच देतो 
   आयुष्यात स्वप्नपूर्तीला खरा आधार...!

                     -- डॉ. कल्पेश पाटील.                                                                                                            

Wednesday, 4 November 2009

फक्त माझ्यासाठी ...





देवाच्या दिव्याप्रमाणे तू तेवत रहा,
सकाळच्या  सुर्याप्रमाणे तू आनंदाच्या छठा फैलवत रहा;
निशिगंधाच्या फुलाप्रमाने,
तुझ्या प्रेमाचा गंध दरवळत रहा 

                      फक्त माझ्यासाठी ...........


खळखळत्या झर्याप्रमाणे आनंदात रहा,
गवतात उगवलेल्या फुलांप्रमाणे  मिश्किल हास्य देत रहा  ;
पक्ष्याप्रमाणे  या जीवनाच्या आकाशात,
प्रेमाच्या पंखान्नी उड़त रहा

                      फक्त माझ्यासाठी....


वसंत रुतुप्रमाने हर्षदायी रहा,
हिवाळ्याच्या गुलाबी सकाळी प्रमाणे उबदार रहा  ;
समुद्राच्या गगनचुम्बी लाटान्प्रमाने,
तुही भरारी घेत रहा 

                      फक्त माझ्यासाठी.....

पावसाळ्यातल्या  इन्द्रधनुष्यावर 
प्रेमाची कमान लावून पहा,
माझ्या ओंजळीत असलेल्या
या भावानांमध्ये  डुम्बून पहा 
आणि 
सदा सर्वदा तू बहरत रहा
                     फक्त आणि फक्त माझ्यासाठी ...

                      ----डॉ. कल्पेश पाटील.

" मनस्वी "



















आळवाच्या पानावर 
                          पाणी  थांबत नसत .
तरी......तरी,
एखादा  " मनस्वी "  थेंब 
                          जागा हेरून बसतो .......!


बंडखोर वारा देतो धक्के 
                           पण थेंबाचे  मनसूबे पक्के......!


पानाची मखमल 
                        आणि थेंबाची  चमक ,
दोन्ही किती....किती 

                       एकरूप असतात  ,

थेंबासाठी पान 
                  आणि पानासाठी थेंब 
वाऱ्यावर   झुलत 
                   हळूच हसत असतात.........!!!
                

                   --- डॉ. कल्पेश पाटील.