पहिल्या कवितेचा प्रयत्न,
कसा करु? कळत नाही,
खूप काही मनात आहे,
पण कागदावरती येत नाही.
विषय घेऊ का चाल ठरवू,
सुरुवात आधी कशी करु?
मग म्हटल विषय नको,
सोप्या चालीचीच कविता करु.
चाल ठरवून झाली तरी,
विषय अजून शोधत आहे.
तो पर्यंत विषय सोडून,
नुसतेच यमक जोडत आहे.
कधी तरी शांतपणे,
पुन्हा एकदा प्रयत्न करीन ,
चालीबद्दल नक्की नाही,
पण विषय तरी नीट धरीन.....
---डॉ.कल्पेश पाटील.
No comments:
Post a Comment