
काही भोग असेच असतात ,
ओठ मीटून भोगायचे;
पापणीवरल्या पाण्याला
वाहाण्यापुर्तेच सांगायचे .
कही सुर असेच असतात ,
जुळतांना तूटायचे....!
आपण फक्त उरले सुरले ,
ओल्या कंठी आळवायचे ...!
कही वाटा अश्याच असतात ,
चालतांना हरावयाच्या....!
आपण फक्त उरल्या सुरल्या ,
पावलं खेचत तुडवायच्या...!
काही रुतु असे असतात ,
पान अन् पान झडायचे ....!
आपण फक्त उरले सुरले ,
पाचोळ्यात शोधायचे....!
कुठलेच वसे असे नसतात
उतुन मातुन टाकायचे...!
आपले भोग आपण ,
फक्त ओठ मीटून भोगायचे.....!!!
पापणीवरल्या पाण्याला वाहाण्यापुर्तेच सांगायचे ............!
- डॉ कल्पेश पाटील.
No comments:
Post a Comment