
गरज म्हणुन नात कधी जोडू नकोस;
सोय म्हणुन सहज असा तोडू नकोस !
रक्ताच नाही म्हणुन कवडीमोल ठरवू नकोस ,
भावनांच मोल ओळख मोठेपनात हरवूनकोस !
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यांवर नव नात जुळत असत,
जन्मभर पुरेल इतक भरून प्रेम मिळत असत !
तुझी ओंजल पुढे कर , कमीपणा मानू नकोस ,
व्यवहारातल देण घेण फक्त मध्ये आणू नकोस !
मिळेल तितक घेत रहा , जमेल तितक देत रहा ,
दिलं घेतलं सरेल तेव्हा ....पुन्हा मागुन घेत रहा !
समाधानात तड-जोड़ असते, फक्त जरा समजुन घे,
"नातं " म्हणजे ओझ नाही, मनापासून उमजुन घे !
विश्वासाचे 'चार' शब्द , दुसर कही देऊ नकोस ,
जाणीवपूर्वक "नात" जप , मध्येच माघार घेऊ नकोस.....!
मैत्री केली आहेस म्हणुन संगावास वाटतय .....................!!!
- डॉ . कल्पेश पाटील.
This comment has been removed by the author.
ReplyDelete