देवाच्या दिव्याप्रमाणे तू तेवत रहा,
सकाळच्या सुर्याप्रमाणे तू आनंदाच्या छठा फैलवत रहा;
निशिगंधाच्या फुलाप्रमाने,
तुझ्या प्रेमाचा गंध दरवळत रहा
फक्त माझ्यासाठी ...........
खळखळत्या झर्याप्रमाणे आनंदात रहा,
गवतात उगवलेल्या फुलांप्रमाणे मिश्किल हास्य देत रहा ;
पक्ष्याप्रमाणे या जीवनाच्या आकाशात,
प्रेमाच्या पंखान्नी उड़त रहा
फक्त माझ्यासाठी....
वसंत रुतुप्रमाने हर्षदायी रहा,
हिवाळ्याच्या गुलाबी सकाळी प्रमाणे उबदार रहा ;
समुद्राच्या गगनचुम्बी लाटान्प्रमाने,
तुही भरारी घेत रहा
फक्त माझ्यासाठी.....
पावसाळ्यातल्या इन्द्रधनुष्यावर
प्रेमाची कमान लावून पहा,
माझ्या ओंजळीत असलेल्या
या भावानांमध्ये डुम्बून पहा
आणि
सदा सर्वदा तू बहरत रहा
फक्त आणि फक्त माझ्यासाठी ...
----डॉ. कल्पेश पाटील.
No comments:
Post a Comment