आळवाच्या पानावर
पाणी थांबत नसत .
तरी......तरी,
एखादा " मनस्वी " थेंब
जागा हेरून बसतो .......!
बंडखोर वारा देतो धक्के
पण थेंबाचे मनसूबे पक्के......!
पानाची मखमल
आणि थेंबाची चमक ,
दोन्ही किती....किती
एकरूप असतात ,
थेंबासाठी पान
आणि पानासाठी थेंब
वाऱ्यावर झुलत
हळूच हसत असतात.........!!!
--- डॉ. कल्पेश पाटील.
No comments:
Post a Comment