पक्ष्यांना जर आत्मचरित्र असती तर
इतरांवरच्या कुरघोडीच्या
इतिहासाची पानं त्यात नसती.
सामोरी येऊ नयेत
इतिहासाची पानं त्यात नसती.
सामोरी येऊ नयेत
पण आहेत अशी...
अनेक उघडी सत्य नसती....!
खोटेपणा मिरवणारी
बोलती फुशारकी त्यात नसती ......!
स्वाभिमानाच्या बुराख्या आडचा
नखरेल खोटारडेपणा नसता ....!
असते फक्त निसर्गाच्या पवित्र्याचे
निखळ , सखोल , उमलते सन्दर्भ .....!
मिळमीळीत वाटणार्या स्वच्छ सत्याचा प्रकाश
पण ........
म्हणुन पक्ष्यांना आत्मचरित्र नाहीयेत
कारण आम्हाला आमच्यापुरती पटेल तशी सत्य हवियेत.....!!!
- डॉ.कल्पेश पाटील.
No comments:
Post a Comment