Monday, 23 November 2009

एकट असाव अस वाटत...




एकट असाव अस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

अवती भोवती रान सगळ
मुक मुक असत,
वाट दिसु नये इतक
धुक धुक असत,
झाडाखाली डोळ मिटून बसावस वाटत...!


आपल आपण एकट असावस वाटत

येते येते हूल देते
सर येत नाही,
घेते घेते म्हणते तरी
जवळ घेत नाही,
अशा वेळी खोट खोट रुसावस वाटत...
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

कुठे जाते कुणासठाउक
वाट उंच सखल,
त्यात पुन्हा सगळीकडे
निसरडीचा चिखल,
पाय घसरुन आदळल्यावर ह्सावस वाटत...
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

पाखर जरी दिसली नाहीत
ऐकु येतात गाणी,
आभाळ कुठल कळ्त नाही
इतक निवळ पाणी,
आपल्या डोळ्यात आपल रूप दिसावस वाटत...

ओळीमागुन गाण्याच्या
थरारत जावस वाटत,
आभाळतुन रंग 
भरत जावस वाटत,
सुराच्या रानात भुलून फुलावस वाटत...


कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत ....!



                             ---डॉ. कल्पेश पाटील.

No comments:

Post a Comment