धबधब्यासारख आयुष्य असाव-
खळाळते दुग्धतूषार उडवत जगाव;
रस्त्यांसारखे इमले असावेत-
बुलंद आणि लांब जाणारे!
धुक्यासारख प्रेम कराव-
सगळ्यान्ना आपल्यात सामावून घेणार;
डोंगरा एवढी दुःख असावीत-
सर्वाना हेवा वाटावी अशी!
ओल्या जखमेंप्रमाणे अपमान असावेत-
सतत भळभळणारे;
ठंडी सारखी क्षमा असावी-
घरट्यात परतायला लावणारी!
प्राजक्ता सारख सुख असाव-
मंद मंद तुकडा वाटत फिराव;
पांघरुणासारखी नाती असावीत-
ऊबच ऊब देणारी!
आणि..........
सुर्यास्तासारख मरण असाव
विषण्णमनाने पहाव अस!
No comments:
Post a Comment