
साचलेल्या पाण्यात असतांना
प्रवाहविना कुजणाऱ्या पाण्यात जगतांना ;
कोण म्हणतो , वाऱ्याच्या आशेने
मी जगत नव्हतो...!
प्रवाहविना कुजणाऱ्या पाण्यात जगतांना ;
कोण म्हणतो , वाऱ्याच्या आशेने
मी जगत नव्हतो...!
श्वास गोठवीणाऱ्या थंडीत
काळजाचे ठोके चुकवीणाऱ्या भयाण शांततेत
कोण म्हणतो , फुप्फुसांच्या धगिने
मी श्वास फुलवत नव्हतो ....?
पिकल्या पानांची पानगळ पहातांना ,
निष्पर्ण झाडांना न्ह्याहाळतांना ,
कोण म्हणतो , येत्या वसंताचे
धुमारे माझ्या मनात फुटत नव्हते....?
ग्रीष्माच्या झळीने होरपळतांना
मृगजलाच्या शोधात हिंडतांना ,
कोण म्हणतो , काळ्या मेघाची
मी वाट पाहत नव्हतो.......?
ढगांच्या गडगडाटात , विजेच्या लाखलखाटात
भीतीने गांगरलेलो असतांना ,
कोण म्हणतो मी मेघांच्या सरींमधे
चिम्ब भिजत नव्हतो....?
हुडहुडी भरवणाऱ्या बर्फाळी हवेत,
श्वास गोठवीणाऱ्या थंडीत असतांना ,
कोण म्हणतो , मी हृदयाच्या थोक्याने
रक्त वितळवत नव्हतो......?
मी लुकलूकत्या तारयांचे
दीप मनात तेवत ठेवून जगत होतो......!
जगत आहे ...........!!
अणि जगत राहणार ................!!!
- डॉ कल्पेश पाटील.
काळजाचे ठोके चुकवीणाऱ्या भयाण शांततेत
कोण म्हणतो , फुप्फुसांच्या धगिने
मी श्वास फुलवत नव्हतो ....?
पिकल्या पानांची पानगळ पहातांना ,
निष्पर्ण झाडांना न्ह्याहाळतांना ,
कोण म्हणतो , येत्या वसंताचे
धुमारे माझ्या मनात फुटत नव्हते....?
ग्रीष्माच्या झळीने होरपळतांना
मृगजलाच्या शोधात हिंडतांना ,
कोण म्हणतो , काळ्या मेघाची
मी वाट पाहत नव्हतो.......?
ढगांच्या गडगडाटात , विजेच्या लाखलखाटात
भीतीने गांगरलेलो असतांना ,
कोण म्हणतो मी मेघांच्या सरींमधे
चिम्ब भिजत नव्हतो....?
हुडहुडी भरवणाऱ्या बर्फाळी हवेत,
श्वास गोठवीणाऱ्या थंडीत असतांना ,
कोण म्हणतो , मी हृदयाच्या थोक्याने
रक्त वितळवत नव्हतो......?
मी लुकलूकत्या तारयांचे
दीप मनात तेवत ठेवून जगत होतो......!
जगत आहे ...........!!
अणि जगत राहणार ................!!!
- डॉ कल्पेश पाटील.
No comments:
Post a Comment